*💫मालवण दि.२०-:* भारतीय मजदुर संघ कोकण विभाग संघटन मंत्री पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सचिव श्री. हरी चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री. भगवान साटम यांनी दिली आहे. भारतीय मजदुर संघाचे २३ वे त्रैवार्षिक अधिवेशन वर्चुअल पद्धतीने दिनांक १९ व २० जून २०२१ रोजी संपन्न होत असताना भारतीय मजदुर संघाची नवीन प्रदेश कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी कोकण विभाग मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुदुर्ग या विभाग संघटन मंत्री पदी श्री हरी चव्हाण यांची निवड करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला सौ. अस्मिता तावडे यांची प्रदेश कर्यासमितीवर निवड करण्यात आली तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री अनिल ढुमणे व प्रदेश महामंत्री पदी मोहन येणुरे यांची निवड करण्यात आली. अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करत असताना कामगार हिताच्या विविध कायद्यांची तात्काळ अंमलबजावणी व सामाजिक हिताच्या अमलबजावणीचे ठराव पारित करण्यात आल्याची माहिती साटम यांनी दिली.
भारतीय मजदुर संघ कोकण विभाग संघटन मंत्री पदी हरी चव्हाण
