जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले लोकार्पण
*💫कणकवली दि.२०-:* भिरवंडे ग्रामपंचायत मार्फत भिरवंडे गावातील श्री देव रामेश्वर मंदिर येथील भक्त निवास येथे १० बेडचा ग्राम विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे.त्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ तसेच गावात रुग्ण वाढू होऊ नये याची दक्षता घ्यावी असे सतीश सावंत यांनी आवाहन केले. यावेळी पं. स. सदस्य मंगेश सावंत, सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश घाडीगांवकर, ग्रा प सदस्य मिलिंद पवार रश्मी सावंत,ग्रामसेवक राकेश गोवळकर, आरोग्यसेवक राकेश चव्हाण, आरोग्यसेविका अक्षता सावंत, मदतनीस नम्रता सावंत, तलाठी समृद्धी गवस, पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत, संदीप सावंत, विशाल सावंत, ऋषीकेश सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
