सिंधुदुर्गातील एस. टी. प्रवासी वाहतूक २३ जूनपासून पुर्ववत…

*💫कणकवली दि.२०-:* राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागामार्फत येत्या २३ जूनपासून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक पुर्ववत सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सोमवारपासून कणकवली-लातूर, सांगली या दोन फेर्यां सुरु करण्यात आल्या आहेत. १४ जूनपासून सुरु केलेल्या फेऱ्या चालू असणार आहेत.कणकवली आगारातून २१ जूनपासून लातूर सकाळी ७ वाजता तर सांगली दुपारी १२ वाजता सुटणार आहेत. वेंगुर्ला, मालवण सायंकाळी ५.३० वाजता सुटणार आहेत. कळसुली, नरडवे, वैभववाडी सकाळच्या सत्रात दोन, तर फोंडा एक फेरी आणि सावंतवाडीला दिवसभरात नऊ फेर्यां तुर्तास सुरु आहेत. मालवण, देवगड, वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी या आगारातूनही मर्यादित फेर्यां कणकवली मार्गे सुरू आहेत. मात्र सिंधुदुर्ग विभागातून २३ जूनपासून जिल्हातील बहुतांश स्थानिक गावांतील फेऱ्या सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page