भाजप कणकवली ग्रामीण मंडलच्यावतीने आयोजन
*💫कणकवली दि.२०-:* भाजपा कणकवली विधानसभा आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण मंडलाच्यावतीने कोरोना महामारीत,तोक्ते चक्रीवादळात जीवाची बाजी लावणाऱ्या कणकवली तालुक्यातील वीज वितरणच्या वायरमन यांनी काम केले,त्याचा भाजपतर्फे २३ जूनला रेनकोट वाटप करत सन्मान आ.नितेश राणे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,जिल्हाध्यक्ष राजन तेली,सभापती मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,अशी माहिती तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिली. भाजप ग्रामीण मंडलाच्यावतीने आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झाले त्या काळात सर्वत्र वीज खंडित झाली होती. मात्र दिवस-रात्र मेहनत करत आपल्या तालुक्यातील सर्व लाईनमन,वायरमन यांनी मेहनत घेतली.त्यामुळेच आपल्याला लवकर वीज सुरु झाल्याने दिलासा मिळाला. त्यामुळे त्यांचा सन्मान भाजपातर्फे कणकवली कार्यालयात करण्यात येणार असल्याने सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष सोनू सावंत,माजी सभापती दिलीप तळेकर,सरचिटणीस महेश गुरव यांनी केले आहे
