लॉकडाऊनमधून सवलत मिळाल्याने जिल्हा व्यापारी संघाने मानले पालकमंत्र्यांचे आभार

जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी दिले प्रसिद्धि पत्रक

मालवण कोविड महामारीच्या पार्श्वभुमीवर ब्रेक द चेन नियमावली नुसार सिंधुदुर्गाचा समावेश चौथ्या गटातून तिसऱ्या गटात होऊन सर्व व्यवसाय व आस्थापना सुरू करण्याची सवलत मिळवून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आभार मानले आहेत. याबाबत अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी म्हटले आहे, की मागील महिन्यात पालकमंत्री, आम.वैभव नाईक, जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग यांचे समवेत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेच्या वेळी महासंघाने टाळेबंदी शिथीलते बाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यातील बहुतांश बाबींचा अंगिकार ही पालकमंत्र्यांनी राज्यशासनाच्या आदेशात करवून घेतला होता. हे आदेश सोमवार पासून (दि.२१जून) फक्त एका आठवड्या साठी लागू आहेत. या काळात जर पॅाझिटिव्हीटी ची टक्केवारी वाढली तर आपण पुन्हा चौथ्या गटात जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन मिळालेल्या या सवलतींचा वापर तारतम्याने करून कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करतच व्यापाऱ्यांनी व्यवसाय करणे स्वत:च्या व व्यवसायाच्याही आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात जनजागृती करून कोरोना प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी पर्यत्न करावेत. जेणे करून आपला जिल्हा लवकरात लवकर दुसऱ्या आणि पहिल्या गटात जाऊ शकेल व येत्या सणवारांच्या मोसमातच येऊ घातलेल्या सांभाव्य तिसऱ्या लाटेस येण्या पासुन थोपविणे शक्य होईल, असेही प्रसाद पारकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page