मालवण दि प्रतिनिधी पळसंब ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना ३५० हळद रोपांचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा आमदार वैभव नाईक, नंदिनी वैभव नाईक,पळसंब सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक श्री.युवराज चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी,पळसंब सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर,ग्रामपंचायत सदस्य श्री.एकनाथ चिंचवलकर,प्रमोद सावंत,नारायण सावंत,बाबा सावंत, तालूका उद्योग प्रमुख मंगेश गावकर , अनिल गावकर , समिर लब्दे, प्रकाश वराडकर, कृष्णा सावंत,अशोक जुवेकर,गुरू परब,तात्या परब,रोशन चिंचवलकर,उल्हास सावंत,राजन पुजारे,अमित पुजारे,शैलेंद्र अणावकर,विशाल मेस्त्री,प्रीतिश सावंत,रुपेश पुजारे इत्यादी उपस्थित होते. यावेळी दोनशे आवळा, कोकम,जांभूळ रोपे लावण्यात आली.झाडे बदिस्त करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी स्टील जाळी बंडल यावेळी दिले.
पळसंब येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते हळद रोपांचे वाटप
