ग्रामविलगिकरण केंद्रास अन्नधान्य साहित्याचे वाटप

सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिवउद्योग तालुकाप्रमुख मंगेश गावकर यांचा पुढाकार

*💫मालवण दि.२०-:* शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिना निमित्त शिवसेना चिंदर व शिवउद्योग तालुका प्रमुख मंगेश गावकर यांच्या वतीने ग्राम विलगिकरण केंद्राला वीस डझन अंडी, शंभर बिस्किट पुढे, पाच लिटर सॅनिटायझर, पन्नास मास्क, बिसलरी बाॅटल भेट देण्यात आली. यावेळी उप विभाग प्रमुख अनिल गावकर, प्रकाश वराडकर, समिर लब्दे, संदीप पारकर, संजय हडपी, मिलींद चिंदरकर, प्रसाद टोपले, बाबु वळंजु, रिया घागरे, निलेश रैवडेकर, जानवी घाडी, नम्रता महांकाळ, केदार परुळेकर, आरोग्य सेवक गोसावी, पोलिस पाटील दिनेश पाताडे, भाई तावडे, रोहन पाताडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page