पाडलोसमध्ये रिक्षाला बाजू देताना टेम्पोला अपघात

*💫बांदा दि.१९-:* बांदा-शिरोडा मार्गावरून बांद्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो पाडलोस केणीवाडा येथे समोरून येणाऱ्या रिक्षेला बाजू देताना कलंडला. सुदैवाने चालक व क्लिनरने बाहेर उडी घेतल्याने अनर्थ टळला. रात्री उशिरापर्यंत टेम्पो बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दांडेली, पाडलोस, मडुरा, शेर्ले भागात जिओ केबलसाठी दोन वर्षांपूर्वी खोदाई करण्यात आली होती. सदर चर केवळ मातीच्या साहाय्याने बुजविल्याने समोरून येणाऱ्या वाहनास बाजू देताना साईडपट्टीधोकादायक बनली आहे. आज संध्याकाळी पाडलोस केणीवाडा येथे बांद्याच्या दिशेने जात असलेल्या आयशर टेम्पो समोरून येणाऱ्या रिक्षाला बाजू देताना साईडपट्टीवर कलंडला. केबलसाठी खोदाई केलेला चर केवळ मातीच्या साहाय्याने बुजविल्याने असे अपघात होत असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगत संताप व्यक्त केला. बांदा-शिरोडा मार्गावरील बांद्याच्या दिशेने डाव्या बाजूने संपूर्ण साईडपट्टी धोकादायक बनली आहे. त्यामुळे केबल खोदाईसाठी करण्यात आलेल्या चरावर दगड टाकून साईडपट्टी निर्धोक करण्याची मागणी आरोस विभागप्रमुख मंदार नाईक यांनी केली आहे. अन्यथा येत्या स्वातंत्रदिनी उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page