सावंतवाडी पेट्रोल पंपावर वाढविली सुरक्षा
*💫सावंतवाडी दि.१९-:* शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ येथे पेट्रोल पंपावर आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजित स्वस्तात पेट्रोल वाटप कार्यक्रमावेळी भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत याचे पडसाद उमटू नये यासाठी सावंतवाडी पोलिसांकडून सावंतवाडीच्या सर्व पेट्रोल पंपावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई येथे शिवसेना भवन समोर भाजप शिवसेनेत काही दिवसांपूर्वी राडा झाला होता. त्यानंतर आज शिवसेना वर्धापनदिनी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आयोजित केलेल्या स्वस्तात पेट्रोल वाटप वेळी शिवसेना भाजप आमनेसामने आले आहेत. जिल्ह्यात इतर ठिकाणी याचे पडसाद उमटू नये यासाठी पोलिसांनी सावंतवाडीत देखील पेट्रोल पंपावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .
