कणकवली बस स्थानकातील वीज पुरवठा सुरू…

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली बस स्थानकातील आठवडाभर बंद असलेला वीज पुरवठा दुरुस्ती नंतर काल शुक्रवारी सायंकाळी काही प्रमाणात सुरू झाला. दरम्यान वीजेच्या कमी जास्त दाबामुळे एस. टी. सह दुकानदारांची वीजेची उपकरणे निकामी झाल्याने संबधिताचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एस. टी. च्या स्थानिक अधिकायांनी आज नुकसानीची पहाणी करून वरीष्ठांना अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये संगणक, दूरदर्शन संच, ट्युब, पंखे आदींचा समावेश आहे. सुरळीत वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा चालू आहे की नाही हे लक्षात येईल. ठेकेदाराने वायरिंगमधील दोष शोधून काढला असला तरी अद्याप काही दुकानदार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू व्हायचा आहे. एस. टी. प्रवासी वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे. मात्र वीज परवठ्याअभावी उपहारगृहासह बहुतांश दुकाने अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत. दुकानदारांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

You cannot copy content of this page