सहाय्यक अभियंता आजगेकर यांचे आश्वासन : तूर्तास चिखलात बसून आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित
*💫बांदा दि.१९-:* शेतजमीन कालव्यात कोसळून झालेल्या नुकसानासाठी चिखलात बसून उपोषण करण्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी दिला होता. परंतु तिलारी पाटबंधाऱ्याचे सहाय्यक अभियंता बी. आजगेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नियमाप्रमाणे मोजमाप करून आठ दिवसांत नुकसानभरपाई देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे चिखलात बसून आंदोलन करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती शेतकरी राजू जाधव यांनी दिली.
