आरोग्यविषयक सुविधांची तालुकानिहाय माहिती उद्योगमंत्र्यांना तात्काळ पाठवा

सतीश सावंत यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले पत्र

*💫कणकवली दि.१९-:* देवगड, वैभववाडी, कणकवली तालुक्यातील कोविड रुग्णांची वाढती रुग्ण संख्या विचारात घेता, कोविड रुग्णांसाठी आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याअनुषंगाने १८ जून , २०२१ रोजी उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यानुसार आवश्यक त्या आरोग्यविषयक सुविधांची तालुकानिहाय माहिती घेऊन, सदर साहित्यांची उद्योगमंत्री यांच्याकडे तत्काळ मागणी करावी असे पत्र शिवसेना नेते सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे दिले आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली तिन्ही तालुक्यांसाठी आरोग्यविषयक सर्व सुविधा आपणाकडून पुरविण्याची उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांनी मला ग्वाही दिलेली आहे. तरी देवगड, वैभववाडी, कणकवली या तीन तालुक्यांमधील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, व उपकेंद्रे यांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या आरोग्यविषयक सुविधांची तालुकानिहाय माहिती घेऊन, सदर साहित्यांची उद्योगमंत्री यांच्याकडे मागणी करावी असे सतीश सावंत यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page