*राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने वितरण
*💫वेंगुर्ले दि.१९-:* भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रेडी जिल्हा परिषद मतदार संघात युवक काँग्रेसच्यावतीने शिरोडा गावातील शेतकऱ्यांना पावसाळी रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सिद्धेश परब, वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कृष्णा आचरेकर, रेडी जिल्हा परिषद युवक काँग्रेस अध्यक्ष चंदन हाडकी, शिरोडा युवक काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, सरचिटणीस आनंद गोडकर, गौरव परब, आबा मसुरकर, समीर आचरेकर, निकी परब, आपा गावडे तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
