साटेली-भेडशीला २३ पर्यंत रुग्णवाहिका न मिळाल्यास आंदोलन

प्रवीण गवस यांचा इशारा

*💫दोडामार्ग दि.१९ सुमित दळवी-:* साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रोजची रुग्णसंख्या ही शंभरीपार आहे,अशा आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका आवश्यक असते. अतिशय ग्रामीण भागात असलेल्या या आरोग्य केंद्रात गंभीर रुग्णांना ने आण करण्यासाठी एब्युलन्सची आवश्यक्यता असताना स्थानिक प्रतिनिधी केवळ जनतेला फक्त आश्वासन दाखवत ती आपणच देणार असल्याचे बढाया मारत आहेत मात्र ही एब्युलन्स अजूनही येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे जनतेला आरोग्याच्या बाबतीत तरी आश्वासने देऊ नका असा इशाराच जणू सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांनी दिला आहे, याबाबत ते जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देणार असून २३ जुनपूर्वी एब्युलन्स साटेली भेडशी आरोग्य केंद्राला न मिळाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आपण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page