*💫वेंगुर्ले दि.१९-:* रेडी गावतळे येथील महाराष्ट्र गोवा हद्दी वरील पोलीस चेक पोस्ट परिसरात काल मद्यरात्री वन्य प्राणी मगर आढळून आली. याबाबत ड्युटीवरील पोलीस श्री. नाईक, श्री किरण पिळगांवकर, यांनी कळविल्या नुसार वनविभागाने तात्काळ दखल घेऊन जागेवर मद्यरात्रौ 1.30 ते 2.00 च्या दरम्यान जात स्थानिक ग्रामस्थ व चेक नाका पोलीस अधिकारी यांचे मदतीने 6 ते 7 फूट लांब अंदाजे 5 ते 6 वर्ष वयाच्या वन्यप्राणी मगरीस ताब्यात घेत तीस नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले. वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे म्हणाले की, मगर हा मांसभक्षक सरपटणारा प्राणी आहे. त्यास वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 अन्वये संरक्षित केले असून अनुसूची 1 मध्ये वर्गीकृत केले आहे. जलीय पर्यावरण संस्थेमध्ये मगर हा सर्वोच्च भक्षक किंवा शिकारी प्राणी आहे आणि त्याच्या असण्याने ही जलीय पर्यावरण संस्था सुस्वरूप आणि आरोग्यदायी राहते. दरम्यान रेडी तील हे बचाव कार्य वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री अमृत शिंदे, वनपाल मठ श्री. चव्हाण, वनरक्षक तुळस श्री कांबळे , राहुल मयेकर, पोलीस नाईक, श्री किरण पिळगांवकर तसेच स्थानिक ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी यांनी यशस्वी केले.
*वनविभागाने रेडी येथे आढळलेल्या मगरीला पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात
