साटेली-भेडशी परिसरात विजेचा पाच दिवस खेळखंडोबा

चार दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करा;अन्यथा आंदोलन:सेनेच्या मदन राणेंचा इशारा

*दोडामार्ग सुमित दळवी-: दोडामार्ग तालुक्यात साटेली भेडशी परीसरामध्ये गेले चार पाच दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सतत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहे. सध्या कोरोना सारख्या रोगाने संपूर्ण व्यापार ठप्प झाल्यामुळे सर्व सामान्य लोक मेटाकुटीला आला आहे. त्यातच वीज वितरणाची भरमसाठ वीज बिल येतात तर मुसळधार पाऊस, गडगडाट वादळीवारा असे काहीही नसताना सतत वीजपुरवठा खंडित होत असतो.त्यामुळे याकडे पुर्णपणे अधिकारी जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साटेली भेडशी परीसरामध्ये वारंवार खंडित होणार वीजपुरवठा येत्या चार दिवसात सुरळीत करावा अन्यथा वीज वितरण कार्यालया समोर उग्र आंदोलन केलं जाईल असे शिवसेना युवा समन्वय मदन राणे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page