फोंडाघाट बेकायदा दारू कारवाई साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

*💫बांदा दि.१८-:* राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने फोंडाघाट-कोल्हापूर रस्त्यावर फोंडाघाट आयटीआय समोर आयशर टेम्पोतून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई करत १७ लाख ६९ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हसन पापा शेख (वय २६, रा. तुळजापूर नाका, जि. उस्मानाबाद) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस एस साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुहास वरुटे, प्रदीप गुरव, दीपक कापसे, मंगेश कर्पे, रवींद्र सोनावणे यांनी फोंडाघाट आयटीआय समोर सापळा रचला होता. कोल्हापूरच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो (एमएच ०७ सी ५३११) तपासणीसाठी थांबविण्यात आला. त्यावेळी टेम्पोच्या पाठीमागील हौद्यात गोवा बनावटीच्या मॅक्डोल नंबर १ व्हिस्कीच्या १८० मिली मापाच्या ५६६४ बाटल्या, इम्पेरियाल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिली मापाच्या ९६० बाटल्या असे एकूण १३८ खोके, व सहाचाकी टेम्पो असा एकूण १७ लाख ६९ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक कुमार कोळी करत आहेत.

You cannot copy content of this page