मच्छिमार्केटला दिलेले नाव जुनेच

शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो यांची माहिती;मात्र सत्ताधाऱ्यांकडून दिखाऊपणा करण्यासाठी राजकारण केले जात असल्याचा केला आरोप

*💫सावंतवाडी दि.१८-:* सावंतवाडी येथील मच्छी मार्केटला पूर्वी पासूनच माजी नगराध्यक्ष ख्रि.लुईस फर्नांडिस यांचेच नाव आहे. त्यामुळे मच्छी मार्केटला नव्याने नाव देण्याचा विषयच येत नाही. मात्र फक्त दिखाऊपणा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून यातही राजकारण करण्यात येत आहे. असा आरोप ज्येष्ठ नगरसेविका तथा शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी ग्लोबल महाराष्ट्र चॅनलशी बोलतांना केला आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सदर लावण्यात आलेला नामकरण फलक तीन महिन्यापुर्वीच बसविण्यात आला होता.

You cannot copy content of this page