कणकवलीत व्यापारी आणि नागरिकांचे स्वॅब कलेक्शन सुरू

कोरोना चाचणी वाढविण्यावर भर मात्र प्रतिसादाची अपेक्षा

*💫कणकवली दि.१८-:* कणकवली शहरारातील 17 पैकी 8 प्रभाग प्रशासनाने कोरोना हॉटस्पॉट जाहीर करीत कोरोना चाचणी सक्तीची केली .या पार्श्वभूमीवर कणकवली कणकवली बाजारपेठ येथील वळंजू कॉम्प्लेक्स येथे आरटीपीसीआर चाचणीला सुरुवात झाली .काल या चाचणीला म्हणावा तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र आज दुपारपर्यंत जवळपास 50च्या आसपास लोकांनी चाचणी केल्याचे समजते. मागील काही दिवसात कोरोनाचे संक्रमण वाढले असल्यामुळे कणकवली शहरातील 17 पैकी 8 प्रभागांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये कालच्या दिवसभरात 46 जनांचे स्वॅब घेण्यात आले होते व आज दुपारपर्यंत 50 पेक्षा जास्त स्वॅब घेण्यात आले असून अजून हि स्वॅब देण्यासाठी व्यापारी व नागरिकाच्या उपस्थिती दर्शविली होती.प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग व नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना स्वॅब देण्यासाठी कणकवली बाजारपेठमधील वळंजू कॉम्प्लेक्स तेथे येण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे या स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.गणेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका सारिका कदम, व्ही बी सावंत, कणकवली नगरपंचायतच्यावतीने स्वछता निरीक्षक विनोद सावंत ,शहर समन्वयक प्रतिष खैरे ,कर्मचारी सतीश कांबळे, विजय चव्हाण ,रुचीर ठाकूर ,संजय राणे, राजू दळवी ,तारक तांबे,राजेश जाधव,व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कणकवली बाजारपेठेपासून आरटीपीसीआर चाचणी सुरू केल्याने सुरुवातीला व्यापारी वर्गाकडून या चाचणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता मात्र चाचणी न केल्यास वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादले जातील अशा प्रकारच्या सूचना आल्यानंतर व्यापारी बांधवांनी या चाचणीच्या दिशेने आपले पाय वळविले आहेत.मात्र चाचणी केल्यानंतर किती दिवस इतरांच्या संपर्कात येऊ नये अथवा रिपोर्ट कधी मिळणार या बाबत संभ्रम आहे.त्याचप्रमाणे कणकवलीतील 8 प्रभागातील नागरिकांची संख्या पाहिल्यास सरसकट तपासणीचे टार्गेट पूर्ण करण्यास किती दिवस लागतील याबाबतही उत्सुकता आहे.

You cannot copy content of this page