बांद्यात वादळी वाऱ्या पावसाने झाडे कोसळून वीज वितरणचे नुकसान

*💫बांदा दि.१८-:* बांदा शहरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्या-पावसाने झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांनी युद्धपातळीवर आपल्या सहकाऱ्यांसह उन्मळून पडलेली झाडे हटवून काही भागात वीज पुरवठा सुरळीत केला. शहरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक चक्रीवादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर स्मशानभूमीनजीक, शहरात जुनी ग्रामपंचायत व देऊळवाडी येथे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने ३ वीज खांब व वीज वाहक तारा तुटून पडल्याने महावितरणचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अभियंता आपटेकर यांनी दिली. सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. उन्मळून पडलेली झाडे हटवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

You cannot copy content of this page