मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला
*💫कणकवली दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत सुरू असलेले हायवेचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून याला सत्ताधारी व विरोधक ही जबाबदार आहेत असा आरोप मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ऑनलाइन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की गेल्या तीन वर्षात मनसेच्या माध्यमातून वेळोवेळी आपण हायवे चे काम कशा प्रकारे निकृष्ट झाले आहे हे दाखवून दिले आहे पण राज्यकर्ते हे नेहमीच ठेकेदाराची बाजू घेऊन त्याला काम करण्यास मदत करतात रस्त्याला खड्डे पडले तडे गेले भरावा होऊन गेला तरीदेखील राज्यकर्ते ठेकेदारावर कोणताही कारवाई करत नाहीत कणकवलीतील रामेश्वर प्लाझा याठिकाणी मागील तीन वर्षे पाणी भरत आहे त्यासाठी चिखलफेक खरंच दिखावा करून एका आमदाराने स्टंटबाजी केल्याचाही आरोप त्यांनी केला तसेच कालच झालेल्या पावसात कुडाळ मधील हायवेवरून पाणी पडत असताना चे व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी कुडाळ वासियांनी प्रत्यक्षात धबधब्याचा आनंद आपल्याला मिळाल्याबद्दल आमदार-खासदार पालक मंत्री यांचे आभार मानले आहेत असेही परशुराम उपरकर म्हणाले सत्ताधारी नेहमी ठेकेदारांची बाजू घेऊन बोलत आहेत कारण टोलवसुली मध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे भले झाला पाहिजे यासाठी सत्ताधारी ठेकेदाराला गोंजारत आहे तसेच कणकवली शहरात झालेले ब्रिजचे काम व सर्व्हिस रोडचे काम हे उत्कृष्ट दर्जाचे असून त्याच्या संदर्भात कोणीच का बोलत नाही आहे असाही सवाल परशुराम उपरकर यांनी सत्ताधारी व विरोधकांना विचारला आहे
