कणकवली विद्यानगर येथील रस्त्यावर आले पाणी;

नागरिकांची झाली गैरसोय

*💫कणकवली दि.१६-:* कणकवली विद्यानगर येथील संजीवनी हॉस्पिटलसमोरील मनोहरस्वरूप इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साठल्याने मोटरसायकल व अन्य वाहने नेणे दूरच रस्त्यावरून जाणेही मुस्किल बनले आहे. गेली काही वर्षे या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत असून रस्ता होणार असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिक रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र हा प्रश्न सुटत नसल्याने नाराजीव्यक्त होत आहे. कणकवली विद्यानगर या परिसरातील हा रस्ता या भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा बनला आहे येथूनच प्रस्तावित डीपी रोड जाणार असल्याने या रस्त्याचे काम होणार कधी ?असा सवाल उपस्थित केला जात आहे .सखल असलेल्या या रस्त्याच्या बाजूला गटार असल्याने गटाराचे सर्व पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून वाहतूक करणे मुश्कील झाले आहे. हा रस्ता होणार असल्याचे वारंवार सांगितले जात असून काम रखडण्या मागील कारण काय याचा खुलासा मात्र अद्याप पर्यंत झालेला नाही .नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या रस्त्याची उंची वाढवावी व गटाराचे काम करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे

You cannot copy content of this page