तळेरे-कासार्डेतील उद्योगपती श्रावणसेठ बांदिवडेकर यांचे निधन

*💫कणकवली दि.१६-:* तळेरे कासार्डे पंचक्रोशीतील सिलीका माइन्समधील प्रसिद्ध उद्योगपती श्रावणसेठ शांताराम बांदिवडेकर (वय 67 )यांचे कोल्हापूर येथे उपचार घेत असताना मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कासार्डे तळेरे परिसरात अतिशय शांत, संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असले श्रावणसेठ बांदिवडेकर गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख होती. शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांनी सढळहाताने केलेली भरीव मदत पंचक्रोशी कधीच विसरू शकणार नाही. २५ वर्षापुर्वी अतिशय कठीण परिस्थितीत मायनिंग व्यवसाय त्यांनी अतिशय मेहनतीने उभा करून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला . शून्यातून प्रारंभ करून अतिशय कष्टाने व जिद्दीच्या जोरावर ते या क्षेत्रात यशस्वी झालेले पहिले उद्योजक होय. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, एक मुलगी, दोनसख्खे भाऊ, दोन चुलत भाऊ,दोन बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी त्यांच्यावर तळेरे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

You cannot copy content of this page