*💫कणकवली दि.१६-:* कणकवली तालुक्यात अतिसवृष्टि सदृश्य पावसामूळे जणजीवनावर परिणाम होत असून सायंकाळी 7 वा. सुमारास कणकवली न्यायालयाच्या प्रवेशद्वारा जवळील मोठे जुने झाड सर्विस रोडवर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या सर्विस रोडने एकेरी वाहतूक सद्या सुरू आहे. यावेळी घटनास्थळी योगेश मुंज, अमोल म्हापसेकर, राजन म्हाडगूत तर न.पं. च्या आपत्कालीन टीमचे मिथुन ठाणेकर, तसेच कर्मचारी दाखल झाले. असून कटरच्या सहाय्याने झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कणकवली न्यायालयासमोर झाड कोसळून सर्विस रोड ठप्प
