गोरगरिबांचा कैवारी , अनाथांचा नाथ व सच्चा

कोरोनायोद्धा माजी नगराध्यक्ष संतोष नांनचे वाढदिवस विशेष

*💫दोडामार्ग दि.१० -:* दोडामार्ग शहरातील एक उत्तम हॉटेल व्यावसायिक आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू असणारे संतोष नानचे यांना राजकारण आणि समाजकारण याची आवड असल्याने लोकांची सेवा करता यावी या भावनेने त्यानी राजकारणात पाऊल ठेवले होते. त्यांचे कार्य पाहून दोडामार्ग ग्रामपंचायतीत २०१२ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली होती. आणि आपल्या मित्रपरिवाराच्या आणि खास लोकांच्या खंबीर पाठीब्यामुळे ते निवडून देखील आले. आणि याच निवडणुकीत त्यांची वर्णी गावच्या सरपंच पदी लागली परंतु, ते कसई- दोडामार्ग चे शेवटचे सरपंच ठरले… कारण त्यानंतर ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत निर्माण झाली. या पहिल्या वहिल्या नगरपंचायत च्या निवडणुकीत देखील त्यानी यश प्राप्त करून शहराचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा सन्मान त्यानी मिळवला. त्यामुळे शेवटचे सरपंच आणि पहिले नगराध्यक्ष असा दुहेरी मान त्यांना प्राप्त झाला आहे. त्यानी आपल्या कामातून अनेक गोर गरीब जनतेला मदत केली आहे. देशावर प्रामुख्याने जगावर पसरलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर संकट काळात देखील त्यांनी दोडामार्ग शहरातील अनेक गरजू, परप्रांतीय मजुरांना मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच अनेक दशावतारी कलाकार, पिगमी एजंट, यासारख्या लोकांना देखील त्यानी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला. शहरातील लोकांना मास्क, सॅनिटायझर यासारख्या वस्तूंचे वाटप केले आहे. जिल्हा बाहेर अडकलेल्या चाकरमानीना देखील माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मदत केली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यानी स्वः खर्चाने नगरपालिकेला २० बेड उपलब्ध करून दिले आहेत. याच बरोबर या वर्षी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची त्यानी पाहणी करत अनेक लोकांना स्वतः आर्थिक मदत केली. त्याचबरोबर त्यांनी महावितरण कार्यालयाला देखील मोलाचे सहकार्य केले होते. याच बरोबर त्यानी गेल्या अनेक वर्षांपासून वीज कनेक्शन अभावी अंधारात रात्र काढणाऱ्या दोन कुटुंबांना विज कनेक्शन मिळवून देण्यात मोलाचं वाटा उचलला. श्री. नानचे यांच्याच सहकार्याने त्यांच्या घरात विजेचा दिवा पेटला आहे. तसेच दोडामार्ग येथील कालव्याची झालेल्या दुर्दशीची वेळोवेळी कल्पना देऊन ही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात त्यानी आणि त्यांच्या मित्रमंडळाने कालव्यात उतरत एक वेगळेच हटक्या स्वरूपाचे आंदोलन छेडले होते. तसेच रस्त्याची झालेली दुर्दशा आणि पालिका प्रशासनाने केलेला दुर्लक्ष आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी स्व: खर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केले. एक उत्तम राजकारणी आणि उत्कृष्ठ खेळाडू असल्याने त्यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. समाजसेवेत झोकून देऊन काम करणाऱ्या या समाजसेवकास ४४ व्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र कडून खुप खुप शुभेच्छा….

You cannot copy content of this page