युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम यांचा पुढाकार;गाव लॉकडाऊन असल्याने नागरिकांची झाली होती हालत
मालवण दि प्रतिनिधी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे काही गावात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उत्स्फूर्त बंद ठेवल्याने जीवनावश्यक वस्तूं मिळणे कठीण बनत आहेत नांदोस गावातही काहीशी अशीच परिस्थिती असल्याने रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेनेचे शिलेदार आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांनी या गावात धाव घेत काही रुग्णांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून श्री वर्दम यांनी पुन्हा एकदा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे नांदोस मध्ये कोरोना बाधित रूग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे कठीण झाले होते. तसेच गावाच्या शेजारील कट्टा येथील बाजारपेठ कोरोणा प्रादुर्भावामुळे गेले कित्येक दिवस बंद आहे. त्यामुळे रुग्णांना जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवुन, कोरोना नियमांचे पालन करत रुग्णांची माहीती घेऊन त्याठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. यावेळी पंकज वर्दम यांच्या समवेत विजय पालव, शाखाप्रमुख राजु गावडे, दिलीप हंजनकर, विकी चव्हाण, अशोक करावडे, शैलेश बिभवणेकर, नितीन नांदोसकर, सुहास माधव उपस्थित होते.
