देशातील डाकसेवकाना केंद्राचा दिलासा

कोरोनाने मृत्यू झाल्यास वारसाला त्वरित नोकरीत सामावून घेणार

*💫मालवण दि.०९-:* कोरोनाने ग्रामीण डाकसेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विनाविलंब त्वरित खात्यात नोकरीत सामावून घ्या, असे आदेश नवी दिल्ली येथून देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील तीन लाख ग्रामीण डाकसेवकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने हा एक महत्वपूर्ण आदेश दिल्याने माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी, सचिव जे. एम. मोडक व अध्यक्ष हरियान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाधान व्यक्त केले आहे. भारतीय टपाल खाते गेली दीडशे वर्षे ग्रामीण व शहरी जनतेची सेवा करत आहे. एक लाख ६५ हजार टपाल कार्यालयांद्वारे १३० कोटी जनतेची सेवा करत आहे. जनतेला ग्रामीण टपाल जीवन विमा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, आरडी, सेव्हिंग बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, स्पीड पोस्ट, रजिस्टर पार्सल, पैसे देणे-घेणे मनिऑर्डर, सुकन्या सुमृद्धी योजना आदी सेवा जनतेला देत आहेत. शाखा पोस्टमास्तर, ग्रामीण पोस्टमन, भारतीय टपाल खाते जगातील नंबर एकचे खाते आहे. डिजिटल युगात या टपाल खात्याने भरारी घेतली आहे. कोरोना काळात जनतेला सर्व टपाल खात्याच्या सर्व सोयीसुविधा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आल्या. कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता, धैर्याने कोरोना संकटाला सामोरे जात ग्रामीण डाकसेवक रोज प्रत्येकाच्या घरी टपाल सेवेचे वितरण करत आहेत. अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवकांचे जनरल सेक्रेटरी एस. एस. महारेवय्या (नवी दिल्ली) यांनी ग्रामीण डाक सेवकांचे प्रश्न संसदेसमोर ठेवून खासदारांनी हा प्रश्न संसदेत लावून धरला व भारतातील ३ लाख ग्रामीण डाकसेवकांना न्याय मिळाला, असे प्रसिद्धी पत्रकात धुरी, मोडक व हरियान यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page