*मालवाहू रेल्वेच्या डब्याला झाराप परिसरात आग*

*💫कुडाळ दि.०९-:* झाराप रेल्वेस्टेशन परिसरात आज अचानक एका मालवाहू रेल्वेच्या डब्याला आग लागली असून, या आगीत हा डब्बा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी या आगीची कल्पना सावंतवाडी आणि कुडाळ एम आय डी सी मधील अग्निशमन दलास देण्यात आली होती. परंतु अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच तो डब्बा पूर्णपणे जळून खाक झाला होता. परंतु, अग्निशमन बंब दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, मोठा अनर्थ टळला आहे. परंतु या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही आहे.

You cannot copy content of this page