शितपेट्या खरेदीच्या पावत्या सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी

अखिल महाराष्ट्र महिला मच्छिमार कृती समितीच्या जिल्हाध्यक्षा स्वप्नाली तारी यांची मागणी

*💫मालवण दि.०९-:* क्यार व महाचक्रीवादळांमुळे राज्यातील सागरी मच्छीमारांना २०१९-२० या कालावधीत पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. पॅकेज वाटपाच्या पहिल्या टप्यात जिल्ह्यातील काही मासे विक्रेत्या महिलांच्या बँक खात्यात शीतपेट्या खरेदीसाठी ६ हजार रुपये काही दिवसांपूर्वी जमा झाले आहेत. परंतु शीतपेट्या खरेदीच्या पावत्या सादर करण्यासाठी पुरेशी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र महिला मच्छीमार कृती समिती सिंधुदुर्गच्या अध्यक्षा स्वप्नाली तारी यांनी मत्स्य विभागाकडे केली आहे. मत्स्य विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे या मागणीबाबतचे पत्र माहितीसाठी सादर केले जाणार आहे. या अगोदर मासे विक्रेत्या महिलांना पावत्या सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत ठरवून देण्यात आली होती. दरम्यान, मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी कोविड संक्रमण व मत्स्य दुष्काळजन्य काळात शीतपेट्या खरेदीचा आग्रह संयुक्तिक नाही. सद्यस्थितीत मासे विक्रेत्या महिलांना थेट रोख रक्कमच द्यावी, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page