*💫सावंतवाडी दि.०७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात ५४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सबनीस वाडा ३, वैश्यवाडा २, सालई वाडा ३, झीरंग १, बांदा नाका २, न्यू सालईवाडा १, भटवाडी १, सावंतवाडी २, तर ग्रामीण भागात आरोंदा १, पाडलोस १, आजगाव २, आंबोली २, कोलगाव १०, कुणकेरी २, मडूरा १, कारीवडे ५, कलंबिस्त १, सोनुर्ली २, आरोस ३, सातोसे ११, बांदा ३, तळवडे ५, गुळदूवे २, कोणापाल २, नीगुडे १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ६८१ रुग्ण सक्रिय आहेत.
