देवगड पडेल येथील घटनेने खळबळ
*💫देवगड दि.०७-:* कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका वयोवृद्धाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची दुःखद घटना पडेल वारीकवाडी येथे घडली आहे. या आत्महत्येमुळे पडेल परिसरात खळबळ उडाली आहे. विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेल वारीकवाडी येथील ७६ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला कित्तेक वर्षे दम्याचा आजार होता. २६ मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट केली गेली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सुरुवातीला ६ दिवस त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर पडेल शांतीनगर येथील त्यांच्या घराजवळ असलेल्या रिकाम्या घरात त्यांना क्वारंटाइन केले होते. शनिवारी रात्री त्यांच्या मुलाने त्यांना जेवन दिले. रविवारी सकाळी ६ वाजता मुलगा वडिलांना चहा देण्यासाठी गेला असता ते त्याला दिसले नाहीत. म्हणून आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह घराजवळील विहिरीत तरंगताना दिसला. याबाबत पोलिस स्थानकात बातमी देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीतील मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कारवाईअंती नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सदर घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत
