*नागरिकांनी व्यक्त केले समाधान
*💫सावंतवाडी दि.०६-:* येथील अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसावेळी कोसळून माती, दगड आणि चिरे रस्त्यावर आले होते. त्यामुळे येथून वाहतूक करताना नागरिकांना अडथळा होत होता. तसेच रस्त्यावर आलेल्या मातीमुळे रस्ता गुळगुळीत होऊन काल त्या ठिकाणी दोन – तीन दुचाकी घसरून अपघात झाले होते. ही बाब कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांना समजताच त्यांनी तातडीने स्वः खर्चाने जेसीबी बोलवून त्या रस्त्यावरील माती, दगड आणि चिरे बाजूला करत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला आहे. त्यांनी केलेल्या या कार्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, संतोष मडगावकर, मोसिन मुल्ला, विशाल पोतणीस आदी उपस्थित होते.
