गोवा बनावटीच्या दारूवर राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई

७ लाख ४९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : सावंतवाडीतील दोघेजण ताब्यात

*💫बांदा दि.०६-:* गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या कारचा सुमारे ६ किलोमीटर पाठलाग करून कारवाई केली. या कारवाईत २ लाख ४९ हजार ७०) रुपयाची दारू व 5 लाख किमतीची कार असा एकूण ७ लाख ४९ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने बांदा ते ओटवणे पाठलाग करून पहाटे केली. याप्रकरणी तुषार विनायक तुळसकर (वय २३ ,रा न्यू खासकीलवाडा गावडेशेत) व यशवंत चंद्रकांत करिवडेकर (वय २३, रा. हरिजनवाडा कारीवडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गचे अधीक्षक बी एच तडवी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस एस साळवे, दुय्यय निरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, सुहास वरुटे, जवान सर्वश्री गुरव, अमर पाटील, विशाल भोई, रवींद्र सोनवणे, शिवाजी जाधव यांनी केली. अधिक तपास दुय्यय निरीक्षक जितेंद्र पवार करीत आहेत.दोन्ही संशयितांना न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली.

You cannot copy content of this page