प्रांताधिकारी वैशाली राजमाने करणार शुभारंभ
*💫कणकवली दि.०६-:* खारेपाटण गावातील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आणि खारेपाटण ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा तथा उदघाटन समारंभ सोमवार ७ जून २०२१ रोजी कणकवली प्रांतअधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती खारेपाटण सरपंच तथा ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी दिली. या कार्यक्रमाला कणकवली तहसीलदार आर जे पवार,गट विकास अधिकारी अरुण चव्हाण,आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम आदि मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा सध्या जिल्ह्यातील व राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना बाधित व्यक्ती आढळल्या नंतर त्यांना पुढील उपचारासाठी कणकवली येथे ४०किलोमीटर तर ओरोस येथे ६५ किलोमीटर दूरवर कोविड सेंटरमध्ये न्यावे लागत होते. या परिस्थितीचा गांभिर्याने विचार खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत आणि सामजिक कार्यकर्ते रफीक नाईक,महेश कोळसुलकर,संकेत शेट्ये यांनी एकत्र येत स्वतः पुढाकार घेऊन खारेपाटण रामेश्वर नगर येथील ग्रामपंचायत मालकीच्या नागरी पर्यटन सुविधा केंद्राची विना वापर पडून असलेली ईमारत कोविड केअर सेंटरसाठी सर्व सोयी सुविधानी परिपूर्ण करून सुसूज्ज अशी तयार केली आहे.याकरिता खारेपाटण ग्रामस्थ व्यापारी वर्ग व खारेपाटण गावात कार्यरत असलेल्या सामाजिक मंडळांच्या वतीने देखील या कोविड केअर सेंटर साठी वस्तुरुप व आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात आली आहे.
