८० वर्षीय माजीसैनिकाच्या स्फुर्तीदायक गीताने आणली रंगत_
*💫दोडामार्ग दि.०६-:* कुडासे खुर्द( पाल पुनवर्सन) ग्रामपंचयात कार्यालयात आज शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रम शासकीय निर्देशानुसार नियोजन करण्यात आले. यावेळी सरपंच संगिता देसाई, सदस्य संदेश देसाई, सदस्या सानवी दळवी, सदस्य सुरत शिरसाठ, महात्मा गांधी गाव तंटा मुक्त समिती अध्यक्ष मनोहर सावंत, पोलीस पाटील दाजी देसाई, मुख्याध्यापिका सौ.सुनीता सावंत, आशा सेविका सौ. ऋणाली देसाई, ग्रामसेविका सौ. डोंगरदिवे, माजी सैनिक अर्जुन नारायण राणे, संदीप दळवी, अनिल सावंत, उमेश नाईक, मानाजी राणे, माणिकराव देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शासन निर्णयानुसार ग्रामपंचयात आवारात कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रगीत व शिवाजी महाराजा विषयी चे राष्ट्रप्रती गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या घोषणा देण्यात आल्या. *माजी सैनिकांचे स्फुर्तीपर गीत* *वीर मराठ्यांची करून दिली आठवण !* यावेळी माजी सैनिक अर्जुन राणे यांनी मराठ्यान प्रतीचे स्फुर्ती गीत स्वतः हुन सादर केल्याने कार्यक्रमात उत्साह वाढला. 80 वर्षीय जेष्ठ माजी सैनिकांनी या शुभ दिनी “संताजी , धनाजी” या वीरांची शौर्य गाथा गाऊन प्रबोधन केले. उपस्थितानी त्यांच्या मागून सूर धरला. अंगावर शहारे येणारे हे शौर्य गीत कार्यक्रमातील लाखवेधी ठरले. कार्यक्रमा नंतर जि.प.पू.प्राथमिक शाळा पाल पुनवर्सन (कुडासे खुर्द) येथे कोरोना विलगिकरण कक्षाची पाहणी गाव सनियंत्रण समितीचे सदस्य यांनी केली. या कक्षासाठी अनेक दात्यानी केल्या मदतीचे समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कोरोना होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असून सर्वांचे सहकार्य गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणार आहे. कोरोना निर्मूलनासाठी स्वतःची काळजी घेतली तरच कुटुंब व गाव कोरोना मुक्त होईल ही जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थांची आहे. समिती सदस्यांनी आपापली जबाबदारी पार पाडून समितीला सहकार्य करण्याचे आवाहन समिती अध्यक्षांनी केले.
