सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १०२ रूग्ण सापडले

शहरात १३ तर ग्रामीणात ८९

*💫सावंतवाडी दि.०४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १०२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात ८९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

शहरात वैश्यवाडा १, मोरडोंगरी ३, खासकीलवाडा १, मच्छीमार्केट १, सालईवाडा ३, भट वाडी १, ज्युस्तीन नगर १, जुनाबाझार १, झिरंग १, तर ग्रामीण भागात आंबोली ७, देवसु ६, सातोळी १, कारिवडे ९, शिरशिंगे १, सांगेली १, कोलगाव ६, कलंबिस्त ३, कुणकेरी १, आंबेगाव १, वेरले १, नेमळे २, मळगाव ६, तळवडे १८, चराठा ४, माजगाव ३, निगुडे ३, कास ४, बांदा ३, शेरले १, इन्सुली १, मळेवाड १, आरोंदा १, भटपावणी ३, सातर्ड १, सोनुर्ली १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६७५ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page