Headlines

पेंडूर-चिरेखण ते घोडेमुख रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविले….

पेंडुर सरपंच संतोष गावडे व ग्रामस्थांचा असाही आदर्श….!

⚡वेंगुर्ला ता.०१-: वेंगुर्ला तालुक्यातील
पेंडूर येथील चिरेखण ते घोडेमुख रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी मारण्याचे काम श्रमदान व लोकसहभागातून करण्यात आले.
पेंडूर ग्रामपंचायत
सरपंच संतोष गावडे, मित्रपरिवार, उपसरपंच मिलिंद गावडे व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण करण्यात आले. याबाबत तालुका स्तरावरून सरपंच तसेच ग्रामस्थ यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. यावेळी
सरपंच संतोष गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे
पिंटू गावडे, काका नाईक, आपा गावडे, सुनिल गावडे,नंदू गावडे,लक्ष्मण गावडे,रामदास गावडे,अविनाश गावडे,उमेश सावंत,कृष्णा तांडेल,राजू मेस्री, हितेश गावडे,उदय गावडे,मयुरेश राऊत, सुदर्शन गावडे,सुरेश गावडे,विलास गावडे,सत्यवान गावडे,महेश गावडे,सत्यवान बरकुटे, ओमप्रकाश कवठणकर, मनिष गावडे, प्रसन्न बरकुटे, नंदकिशोर चव्हाण, राजाराम चव्हाण, कृष्णा काळोजी, निलेश तोरस्कर, प्रसाद सावंत, संतोष नाईक, प्रभाकर नाईक, उत्तम सावंत, अंकुश नाईक, संदिप नाईक, शाम नेमन, शशिकांत गवंडे, श्रीधर सावंत, दिलीप शेटये, मंगेश गावडे, कृतिक गावडे, घनशाम नाईक, तनय शेट्ये, विलास शेट्ये आदी तुमच्या ग्रामस्थांच्या एकजुटीतून हे काम संपन्न झाले. श्री गणेश चतुर्थी सणापूर्वी हे काम लोकसहभागातून मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page