भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती
*💫कणकवली दि.०३-:* आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी आपले गाव कोरोना मुक्त केले आहे.या पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच व सदस्यांना व्हावे म्हणून भाजपा आमदार नितेश राणे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत.शनिवार ५ जून रोजी zoom अँप वरून हे मार्गदर्शन केले जाणार आहे.तसे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून आणि कणकवली येथे सरपंचांच्या बैठकीत जाहीर केले आहे. आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शना मुळे जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.सरपंच,उपसरपंच आणि सदस्य यांना गावात काय उपाययोजना राभवाव्यात या बद्दल संभ्रम आहे या मार्गदर्शना नंतर सरपंचांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील असा विश्वास आहे.दरम्यान आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी सरपंच परिषद घेऊन पोपटराव पवार याचे मार्गदर्शन ठेवले होते.त्याच प्रमाणे या मार्गदर्शनाचा फायदा जिल्ह्याला होणार आहे.
