नगरसेविका सेजल परब यानी वेधले होते आमदारांचे लक्ष
*💫मालवण दि.०३-:* तौक्ते चक्रीवादळामुळे दांडी येथील घरावर माडाचे झाड पडून नुकसान झालेल्या श्री. नितीन लोणे यांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून तातडीची मदत करण्यात आली. स्थानिक नगरसेविका सौ .सेजल परब व शिवसेना उपशहरप्रमुख श्री. सन्मेश परब यांनी आमदारांचे लक्ष वेधले. यावेळी आमदार म्हणाले कितीही संकट आली शिवसेना नेहमीच जनतेच्या पाठीशी आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात तसेच तालुक्यात खूप नुकसान झाले त्याचे पंचनामे पण तातडीने झाले. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळेल असेही ते म्हणाले. यावेळी श्री. लोणे यांनी आमदार यांचे आभार मानले.यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री. बबन शिंदे, शिवसेना महिला उपजिजिल्हा संघटक तथा नागसेविका सौ. सेजल परब, तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. हरी खोबरेकर, शहर प्रमुख श्री.बाबी जोगी, उपशहर प्रमुख श्री.सन्मेश परब, नगरसेवक श्री.पंकज सादये उपस्थित होते.
