सेना तालूका समन्वयक पूनम चव्हाण यांचा उपक्रम
मालवण (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या संकटात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असताना काही जण स्वयंस्फूर्तीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजीक जाणिवेतून काम करीत आहेत या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण बस स्थानक परिसरात व दलीतवस्ती येथे शिवसेना मालवण तालुका समन्वयक पुनम चव्हाण यांनी स्व:खर्चाने सूक्ष्म जंतुनाशक सोडिअम हायपोक्लोराईट औषधाची फवारणी करून परिसर निर्जंतुकिकरण मोहीम राबविल्याने . नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे . कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आपापल्या वार्ड मध्ये सूक्ष्म जन्तुचे निर्जंतुकीकरण करणे हा उत्तम उपाय असल्याने शिवसेना मालवण तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण यांनी सामाजिक जाणिवेतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण बस स्थानक परिसरात व दलीतवस्ती येथे सूक्ष्म जंतुनाशक सोडिअम हायपोक्लोराईट औषधाची फवारणी केली या औषध फवारणीच्या वेळी पूनम चव्हाण यांच्यासह आबा मालवणकर, बबन मालवणकर, महेश मालवणकर, तुषार मालवणकर, भरत मालवणकर, नागेश चव्हाण, कोळंबकर, सचिन मालवणकर, नितेश मालवणकर, रुपेश मालवणकर आदी उपस्थित होते.
