तौक्ते वादळात मालवणची सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली

अद्याप सुरु नाही

*💫मालवण दि.०३-:* तौक्ते वादळाच्या तडाख्यात मालवण शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सीसीटीव्ही यंत्रणा देखील कोलमडली आहे. यामुळे गेले पंधरा दिवस सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा असलेली ही यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत होणे गरजेचे आहे. कोलमडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेबाबत मालवण पोलिसांकडून संबंधित एजन्सीला कळविण्यात आले असून शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा केव्हा पूर्ववत होते याकडे मालवण वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page