भाजपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा देणार:आम.नितेश राणे
*💫कणकवली दि.०३-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्ष कार्यकाल पूर्ण केला निमित्त्याने भाजपच्यावतीने सेवा सप्ताह साजरा केला जात असून आम. नितेश राणे यांनी या निमित्ताने कोरोना रुग्णाची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनचे १५ कनेक्टर डॉ.गणेश चौगुले यांच्याकडे सुपूर्त केले यावेळी यावेळी आम.नितेश राणे यांच्यासमवेत जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर ,नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री ,नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा गांगण, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, भाजपा कणकवली शहर प्रमुख अण्णा कोदे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, शिरवल सरपंच महेश शिरवलकर, माजी उपसभापती महेश गुरव, नगरसेवक शिशीर परुळेकर ,भाजपा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत ,महेश सावंत, लक्ष्मण घाडीगावकर राजू गवाणकर, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये राजू हिर्लेकर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना आम. नितेश राणे म्हणाले,कणकवली तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे व ऑक्सीजन बेडची कमतरता भासत असल्यामुळे ऑक्सीजन बेड जास्तीत जास्त उपलब्ध व्हावे यासाठी १५ ऑक्सिजन कनेक्टर हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सुपूर्त केले आहेत . कोरोणाचा हा काळ जरी कठीण असला तरी भाजपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व सोयी व सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू अशी ग्वाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली.
