चौके बाजारपेठ पुढील ५ दिवस कडकडीत बंद

चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय*

*💫मालवण दि.०३-:* गेला महिनाभर चौके गावात तसेच पंचक्रोशीतील अन्य गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यातच चौके गावातील प्रतिष्ठित तरुण व्यावसायिक कोरोना संक्रमित होऊन निधन झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समिती चौकेच्या वतीने चौके भराडी देवी मंदिर येथे बोलविण्यात आलेल्या विशेष सभेत शुक्रवार ४ जून पासून पुढील पाच दिवस चौके बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समिती चौकेच्या वतीने चौके भराडी देवी मंदिर येथे विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत ग्रामस्थ , व्यापारी इतर व्यावसायिक यांच्यात चर्चा करुन गावात निर्माण झालेल्या या कोरोना महामारीचे नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. चौके बाजारपेठ हि मालवण- कसाल कुडाळ या रहदारीच्या मार्गावर वसलेली असल्याने बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे शुक्रवार ४ जून पासून पुढील पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय चौके व्यापारी संघाने घेतला. सतर्कता म्हणून गावात वाडीवाडीत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी आरोग्य विभागाच्या सर्व्हे व्यतिरिक्त गावातील तरुण आपल्या वाडी वाडीत तपासणी करणार असून प्राथमिक तपासणीत संशयीत रुग्ण आढळून आल्यास त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल असे ठरविण्यात आले. त्याच प्रमाणे या ५ दिवसात बाजारपेठत विनाकारण फिरणे महागात पडणार असून कामाव्यतिरिक्त विनाकारण बाजारपेठेत फिरल्यास व शासनाच्या नियमांचे पालन न केल्यास आरोग्य रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. तसेच योग्यवेळी पोलिसांचे सहकार्य घेण्याचे ठरविण्यात आले. एकूणच कोरोनाची वाढलेली साखळी व भयभीत झालेले ग्रामस्थ यामुळेच या महामारीचा सामना करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे ठरले आहे.

You cannot copy content of this page