Headlines

राजीव गांधी जयंतीनिमित्त सावंतवाडी काँग्रेसतर्फे अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती उभा बाजार, सावंतवाडी येथील काँग्रेस कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी राजीव गांधी यांच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचे स्मरण केले. आधुनिक भारताच्या उभारणीत राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

कार्यक्रमास सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर, सरचिटणीस राजेंद्र मसुरकर, ज्येष्ठ नेते सुधीर मल्हार, संजय लाड, काँग्रेस संयोजक संतोष जोईल, कौस्तुभ पेडणेकर, काँग्रेस मीडिया तालुकाध्यक्ष आफताब हेरेकर, तालुका सरचिटणीस पीटर फर्नांडिस, माजी शहराध्यक्ष अरुण भिसे, तालुका खजिनदार प्रदीप चौगुले, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज नार्वेकर, संतोष पेडणेकर, साबाजी ऊर्फ बाळा नाईक, सगुण गावकर, अक्षय तळवडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page