Headlines

मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल चान्यायालयीन तिढा सुटला..

अभिनवची याचिका:
रिक्त पदे सहा महिन्यांत भरणार…

⚡सावंतवाडी ता.२०-: उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट साठी प्रतिनियुक्तीवर एक अस्थिव्यंग तज्ञ देण सिआम मशिन 8 आठवड्यात, इतर आवश्यक यंत्रसामुग्री चार आठवड्यात आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे सहा महिन्यात भरतीचे आवेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले. मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल च्या जागेचा प्रश्न आज सुटल्याने यासंदर्भात वेगाने पुढील कार्यवाही करण्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी मान्य केले.
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग ने दाखल केलेल्या जनहित याचिकेची आज न्यायमूर्ती निरज धोते, न्यायमूर्ती शमिँला देशमुख यांच्या समोर सुनावणी झाली.

अभिनव फाऊंडेशन तफेँ वकील महेश राऊळ, वकील मिहीर मोंडकर, वकील निरज लवटे यांनी बाजू मांडली.
सरकारी वकील विकास माळी, शिरीर हिरे यांनी बाजू मांडली. अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग च्या जनहित याचिका प्रकरणी तत्कालीन न्यायमूर्ती कणिँक यांंनी मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल च्या जागेसंबधीचे व्दितीय अपील वेगाने निकाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज राजघराण्यातील दोन्ही कुटूंबामध्ये तडजोड झाली. जागेच्या वादाचे व्दितीय अपील निकाली निघाले. त्यामुळे लवकर मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे काम सुरु होईल, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअस युनिट साठी तातडीने डॉ सचिन बळवंते या अस्थिव्यंग तज्ञ (Orthopadic)डॉक्टर ना प्रतिनियुक्ती दिली आहे. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील इतर रिक्त पदे येत्या सहा महिन्यात भरली जातील.1440 पदांची वैद्यकीय अधिकारी पदांची जाहिरात प्रसिद्ध होऊन भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आहेत. त्यातून सावंतवाडी ला वैद्यकीय अधिकारी देऊ असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

अभिनव फाऊंडेशन चे वकील महेश राऊळ यांनी उपसंचालक कोल्हापूर यांच्या नेतृत्वातील चार सदस्य समितीचा अहवाल आँक्टोबर 2026 मध्ये आला, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
यासंदर्भात न्यायमूर्ती देशमुख यांनी अहवालात नमुद आवश्यक वैद्यकीय यंत्रणा चार आठवड्यात खरेदी करावी, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सीआम मशीन 8 आठड्यात खरेदी करावे. आरोग्य संचालकांनी याप्रकरणी लक्ष घालावे. पुढील तारखेपर्यंत यासंदर्भात कार्यवाही करुन पुढील सुनावणीस पुन्हा आरोग्य संचालक यांनी व्हि.सी.व्दारे हजर रहावे. केलेल्या कार्यवाही ची माहिती द्यावी असे आदेश आज सकिँट बेंचने दिले. सुनावणीस अभिनव फाऊंडेशन च्या जनहित याचिकेवरील सुनावणीस आरोग्य समितीचे अध्यक्ष एन.बी.रेडकर, तेजल परब, राहूल परब हजर होते.

You cannot copy content of this page