सेवानिवृत्त मुख्याध्यापिका इंदिरा पवार यांचे निधन

*💫मालवण दि.०२-:* मालवण देऊळवाडा येथील इंदिरा बाळासाहेब पवार वय ८१ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.मालवण जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कुंभरमाठ या शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. गेल्या महिनाभरापूर्वी त्या कॉलर बोन फॅक्चर झाल्याने आजारी होत्या. यातच त्यांना लोडायबीटीक झाल्याने त्या आजारात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. मालवण येथील वैष्णवी सेल्स व बोअरवेलचे सर्वोसर्वा दादा पवार व डॉ प्रशांत पवार यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page