राज्य केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील निम्मा टॅक्स कमी करावा

ह्यूमन राईट्स प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.०२-:* राज्य सरकारने सामान्य जनतेच्या समस्या निवारण करण्याच्या हेतूने निर्णय घेण्यात यावा गेले वर्ष भर सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी सभारंभांच्या निमित्ताने करण्यात येणारे व्यवसाय बंदच आबेट्टयेत पेट्रोल डिझेल दरवाढ शंभरी वर येऊन पोहोचले आहेत मागील वर्ष भर नोकरी व्यवसाय सुरळीत नाही .वीज बिल प्रॉपर्टी टॅक्स कुठेच सवलत नाही परंतु इंधन दर मात्र आवस्त्व वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य गोरगरीब व्यवसायिक मेटाकुटीला आले आहे, राज्य व केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल वरील निम्मे टॅक्स कमी केले तरी इंधन तीस रुपयांनी स्वत होईल असे मत ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट तर्फे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केले आहे गोर गरीब जनतेच्या घरची चटणी भाकरी सुद्धा अत्यावश्यक सुविधांच्या दर वाढीमुळे महाग झाली आहे. सर्व महागाई चे मूळ हे इंधन दर वाढीशी निगडित असते, परंतु केंद्र आणि राज्य सरकारचे ने उदासीन धोरण अवलंबिले आहे .यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता भरडली जात आहे .त्यात कोरोणा सारख्या महाभयंकर परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेचे नित तेरा , ऑक्झिजन बीड,खाजगी रुग्णालयात होणारी लूट, मानसिक त्रास या सर्वांमुळे जनतेचा विश्वास शासन नियमांचे उदासीन धोरण यामुळे नागरिक भरडले जात आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने सामान्य जनतेच्या हिताची जपणूक करण्याकरिता पेट्रोल डिझेल तीस रुपयांनी स्वस्त होईल. जर सद्य परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेचे समीकरण उच्चांकावर न्यायचे असेल तर पूर्णतः टॅक्स माफ करावा लागेल,त्यामुळे इंधन साठ रुपयांनी स्वस्त होईल व अवघ्या चाळीस रुपयात एक लिटर इंधन मिळू शकेल,यामुळे महागाई झपाट्याने कमी होऊन आर्थिक विकास दर वाढेल व सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिलासा मिळेल याकरिता मंत्र्यांनी सुरक्षेचा खर्च वाढवावा अशी मागणी ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट तर्फे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे

You cannot copy content of this page