रुग्णाची तब्बेत बिघडली तर करायचे क़ाय ? मालवण प से सभेत सुनील घाडीगांवकर यांचा प्रश्न
*💫मालवण दि.०२-:* मालवण तालुक्यातील शिरवडे गावात कोरोनाचे तब्बल ९७ रूग्ण मिळूनही आरोग्य विभाग याबाबत उदासीन असल्याचा आरोप करीत भाजपाचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही शासकीय अधिकारी सायंकाळी ५ वाजल्यानंतर गावात थांबत नाही. अशावेळी एखाद्या रुग्णाची परिस्थिती चिंताजनक बनल्यास करायचे काय ? असा सवाल श्री. घाडीगावकर यांनी मालवण पंचायत समितीच्या सभेत केला . दरम्यान या प्रकरणी हिवाळे प्राथमिक केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेण्याची सूचना सभापती अजिंक्य पाताडे यांनी केली आहे. मालवण पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी झूम ॲप द्वारे घेण्यात आली. या सभेला सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सुनील घाडीगावकर, विनोद आळवे, अशोक बागवे, सोनाली कोदे, मनीषा वराडकर, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर यांच्यासह अन्य सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. शिरवंडेतील कोरोना परिस्थितीवर आरोग्य विभागाकडून झालेल्या दुर्लक्षाबाबत श्री. घाडीगावकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी आपण स्वतः या ठिकाणी परिस्थितीची पाहणी करून आल्याचे स्पष्ट केले. सायंकाळनंतर शासकीय अधिकारी गावात थांबत नसतील तर ही अतिशय चुकीची बाब आहे. याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले. यावेळी शिरवंडे गावात मोठ्या संख्येने रुग्ण मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी रात्री १२.३० वाजता गावचा दौरा करून येथील परिस्थितीची माहिती घेतली. मात्र तालुका आणि जिल्हा आरोग्य विभागाने इकडे दुर्लक्ष केले आहे असे श्री. घाडीगावकर म्हणाले भाजपा नेते दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून येथील रुग्णांना औषध पुरवठा केल्याने गावातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मधुरा चोपडेकर यांनी देवबाग गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित केला. तर सोनाली कोदे यांनी ओझर कांदळगाव रस्त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. रेवंडी येथे अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांकडून कांदळवनाची तोड झाली संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा ग्रामस्थ आत्मदहन करतील, असा इशारा सौ. कोदे यांनी दिला. उपसभापती राजू परुळेकर यांनी तौक्ते वादळात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. किनारपट्टी प्रमाणेच ग्रामीण भागातही काही ठिकाणी पडझड झाली असून तालुक्याला समान न्याय देण्यात यावा, असे ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार माडाला २०० रुपये आणि सुपारीला ५० रुपये भरपाई देण्याचा निर्णय होत आहे. असा निर्णय घेतला तर नुकसानग्रस्तांची चेष्टा होणार असून नुकसानग्रस्तांना भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी राजू परुळेकर यांनी केली. या अनुषंगाने तालुक्यातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायतींच्या इमारतींचेही वादळात नुकसान झाले असून या इमारतींच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळण्याचा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी सांगून सर्व ग्रामपंचायतींना नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. अशोक बागवे यांनी भगवंतगड खारबंधारा पूर्ण न झाल्याने येथील खारे पाणी शेतात घुसल्याचे सांगून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या निर्णयाचे पुढे काय झाले ? असा सवाल केला. अंगणवाडी सेविकांना शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता आणि गरोदर मातांच्या सर्वेक्षणाचे काम दिले आहे. मात्र अंगणवाडी सेविकांनी हे काम करण्यास नकार दिला असून संघटनेच्यावतीने त्यांनी एकत्रितरित्या केलेला खुलासा फेटाळण्यात आल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले. हा खुलासा फेटाळल्यानंतरही ११ जण अद्यापही कामावर हजर झाल्या नसल्याचे त्यांनी सांगताच संबंधितांचे पगार थांबविण्याची सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी केली. तर कोरोनामुळे आज सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही शासनाने अंगणवाडी सेविकांना हे काम न देता किरकोळ सर्वेक्षणाचे काम दिले आहे. ही ड्युटी राष्ट्रीय जबाबदारी असून प्रत्येकाने ती सांभाळलीच पाहिजे. या अंगणवाडी सेविकांना कुठल्याही संघटनेने नोकरीस ठेवलेले नाही. त्यामुळे सर्वांनी हे काम केलेच पाहिजे. ज्या अंगणवाडीसेविका हे काम करण्यास तयार नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उपसभापती राज
