ग्रामनियंत्रण समिती व कासार्डे सिलिका असोसिएशनच्या सौजन्याने केला कक्ष…
*💫कणकवली दि.०२-:* कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे ग्रामनियंत्रण समिती व कासार्डे सिलिका असोसिएशनच्या सौजन्याने रुक्मिणी मंगल कार्यालय येथे वीस खाटांच्या ग्राम विलगीकरण कक्षाचा शुभारंभ कणकवली सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.कासार्डेत विलगीकरण कक्ष सुरू केल्यामुळे परीसरातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, सरपंच बाळाराम तानवडे, उपसरपंच बाबूभाई पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, तलाठी किरण गावडे, पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सिध्दी पालांडे, आरोग्य सेवक संजय सावंत,कोतवाल दिपक आरेकर, माजी उपसरपंच पुजा जाधव, प्रसाद जाधव,संजय नकाशे,संजय पाताडे, दिपक पाताडे, मिलिंद पाताडे, नामदेव बांदिवडेकर, राजीव पाताडे, दिपक सावंत, विद्याधर नकाशे, नंदु कोकाटे, जयेश पाटील, दिपक सावंत,विजय राणे आदी मान्यवर उपस्थित होते. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे ग्राम स्तरावर विलगीकरण कक्षाची सोय केल्याने गावातील रूग्णांना याचा फायदा होणार असून यामुळे स्थानिक पातळीवर उपचार मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. प्रथमदर्शनी वीस खाटांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचबरोबर इतर सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या विलगीकरण कक्षासाठी कासार्डे ग्राम नियंत्रण समिती, कासार्डे सिलीका असोसिएशनचे व श्री. कराळे याचे सहकार्य लाभले आहे.
