जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ…
*💫कणकवली दि.०१-:* महेश गुरव मित्रमंडळाच्यावतीने कोरोना महामारीत रक्तदानाचा संकल्प करण्यात येत आहे. ५ जून २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आशिये येथील प्राथमिक शाळा येथे होणार आहे.या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत ,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे,उपाध्यक्ष सोनू सावंत,माजी सभापती प्रकाश सावंत,मंडळाचे अध्यक्ष महेश गुरव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” आहे, आपल्या गावासह दशक्रोशीतील नागरिकांसाठी दिलासा देण्याच्या दृष्टीने एक सामाजिक उपक्रम घेतला जात आहे.माजी उपसभापती महेश गुरव यांच्या संकल्पनेतून हा रक्तदानाचा संकल्प घेण्यात आला आहे. रक्तदानाच्या माध्यमातून अत्यावश्यक काळात रुग्णाला रक्त देण्याची गरज असते, त्यावेळी आपण केलेलं रक्तदान फार महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच ५ जूनला होत असलेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हा,हे रक्तदान शिबिर होत असताना कोरोना कालावधीत शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून केले जाणार आहे, तरी आपला सहभाग, प्रतिसाद फार महत्वाचा आहे,असे आवाहन सरपंच शारदा गुरव,उपसरपंच संदीप जाधव यांनी केले आहे.
